Fri, Jul 03, 2020 01:33होमपेज › National › भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना कोरोनाची लक्षणे, रुग्णालयात दाखल

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना कोरोनाची लक्षणे, रुग्णालयात दाखल

Last Updated: May 28 2020 4:16PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर मेदांता मेडिसिटी रुग्णालयातील आयसीयू-7 मध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपमध्ये दाखल झालेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी संबित पात्रा यांच्याविषयी ट्विट केले आहे. ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना शिंदे यांनी केली आहे. तसेच भाजप दिल्ली प्रदेशचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, संबित भाई लवकर बरे व्हा! त्याचबरोबर त्यांनी कोरोनाला हरावा या हॅशटॅग वापरला आहे. संबित पात्रा स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी दिल्लीतील हिंदू राव हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून केले आहे.