Sun, Jul 05, 2020 03:15होमपेज › National › भूपेन हजारिकांचा भारतरत्न कुटुंबीयांनी नाकारला

भूपेन हजारिकांचा भारतरत्न कुटुंबीयांनी नाकारला

Published On: Feb 12 2019 2:05AM | Last Updated: Feb 12 2019 2:05AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार भूपेन हजारिका यांना यावर्षीचा मरणोत्तर भारतरत्‍न पुररस्‍कार जाहीर करण्यात आला होता. भारतरत्‍न हा सर्वोच्च नागरी पुरस्‍कार न स्‍वीकारण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. नागरिकत्‍व सुधारणा विधेयकाला विरोध म्‍हणून हजारिका यांच्या  कुटुंबीयानी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भाजप सरकारकडून हा पुरस्‍कार हजारिका यांना जाहीर करण्यात आला होता. यानंतर संगीतकार हजारिका यांचे सुपुत्र तेज यांनी हा सन्‍मान आम्‍ही स्‍वीकारणार नाही असे सांगितले.

हजारिका यांचे पुत्र तेज हे सध्या अमेरिकेत स्‍थायीक आहेत. त्यांनी एका निवेदनाव्‍दारे कळविले आहे. ईशान्‍येतील नागरिककांचा नागरिकत्‍व सुधारणा विधेयकाल तीव्र विरोध आहे. या विरोधाच्या वादाला आपल्या वडिलांच्या नावाचा गैरवापर करण्यात येत असून हे निंदणीय असल्याचेही म्‍हटले आहे.