मशिद ही रिकाम्या जागी बांधली नव्हती : SC

Last Updated: Nov 09 2019 11:59AM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनालाईन 

अयोध्या वादग्रस्त जमीन विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ज्या जागेवर मशिद बांधण्यात आली होती ती रिकाम्या जागेत बांधण्यात आली होती हा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाच्या अहवालाचा हवाला देत हा निर्णय दिला. 

सर्वोच्च न्यायालयाने आज ९ नोव्हेंबर या ऐतिहासिक दिवशी जवळपास २ ते ३ दशके सुरु असलेल्या अयोध्या जमीन वाद प्रकरणी निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यांच्या घटनापीठीने वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच मशिदीसाठी ५ एकर पर्यायी जमीन देण्याचेही आदेश दिले आहेत. हा निकाल देताना सर्वोच्च न्यालायनाने मशिद ही रिकाम्या जागी बांधली नव्हती. त्या जागेवर हिंदू मंदिर सदृष्य दगडी बांधकाम असलेली संरचना होती हा पुरातत्व खात्याचा अहवाल ग्राह्य धरला. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्ष रामलल्ला यांनाच पक्षकार म्हणून मान्यता दिली. 

हे दोन सर्वोच्च न्यायालयाचे निकाल महत्वपूर्ण होते. त्याचबरोबर अलाहाबाद उच्च न्यायालयाने या वादग्रस्त जमीन तीन भागात विभागून देण्याचा निर्णयही चुकीचा असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना पुरातन दस्तऐवज आणि पुरातत्व खात्याचा अहवालाला महत्व दिले. 

'इम्रान खान यांना 'तिच्या'सोबत लैंगिक संबंध ठेवायचे होते'


कोल्हापूर : नवे ४ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह


काल इटलीला, आज स्पेनला मागे टाकले; भारतात कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ सुरुच!


धुळ्यात आणखी २० रुग्णांची भर


पन्हाळा : गाडीला धडकून जखमी झालेल्या रान मांजराला जीवदान (video)


भाजप नेते कपिल मिश्रांच्या भडकावू भाषणांमुळे दिल्ली हिंसाचाराला प्रोत्साहान : मार्क झुकेरबर्ग


जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर


'कोळसा खाणींचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल'


भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चा निष्फळ


रक्तबंबाळ, भुकेने व्याकुळ होऊन चालत घरी गेलेल्या मजुरांसाठी आता 'पायघड्या'