अयोध्या प्रकरणात इंग्रजांच्या भूमिकेमुळे हिंदू मुस्लिमांमध्ये वाद : सुप्रीम कोर्ट

Last Updated: Nov 09 2019 1:31PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.९) अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणी अंतिम निकाल देत ही वादग्रस्त जमीन ही रामलल्लांचीच असल्याचा निर्वाळा दिला. त्याचबरोबर त्यांनी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच ५ एकर पर्यायी जमीन देण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना स्वातंत्र्यपूर्व काळात या वादावर इंग्रजांनी घेतलेल्या भुमिकेमुळे हिंदू आणि मुस्लिम वाद निर्माण झाला असल्याचे मत नोंदवले. 

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणी अंतिम निकाल देताना या जागेवरुन निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज शासकांनी घेतलेल्या भुमिकेमुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद निर्माण झाला असे मत नोंदवले. इंग्रजांच्या शासन काळात १८५३ ला पहिल्यांदा या वादग्रस्त जमिनीबाबत हिंसाचार झाला होता. त्यानंतर १८५९ मध्ये ब्रिटीश शासनकर्त्यांनी या जागेवर रेलिंग उभारले. यानंतर खरा वाद निर्माण झाला. त्यानंतर पूजा थांबल्यानंतर हिंदूंनी बाहेर चबुतरा उभारला आणि तेथे पुजा सुरु केली. 

दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडणे हे बेकायदेशीर असल्याचे कोर्टाने म्हटले. तर याआधी जमीनीला तीन भागांमध्ये विभाजीत करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे न्यायाधिशांनी स्पष्ट केले. आता सुन्नी बोर्डाला दुसरी जागा देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही या निकालात करण्यात आले आहे. 

'इम्रान खान यांना 'तिच्या'सोबत लैंगिक संबंध ठेवायचे होते'


कोल्हापूर : नवे ४ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह


काल इटलीला, आज स्पेनला मागे टाकले; भारतात कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ सुरुच!


धुळ्यात आणखी २० रुग्णांची भर


पन्हाळा : गाडीला धडकून जखमी झालेल्या रान मांजराला जीवदान (video)


भाजप नेते कपिल मिश्रांच्या भडकावू भाषणांमुळे दिल्ली हिंसाचाराला प्रोत्साहान : मार्क झुकेरबर्ग


जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर


'कोळसा खाणींचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल'


भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चा निष्फळ


रक्तबंबाळ, भुकेने व्याकुळ होऊन चालत घरी गेलेल्या मजुरांसाठी आता 'पायघड्या'