Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › National › खुशखबर; आता i Phone ड्युएल सिम मध्ये

खुशखबर; आता i Phone ड्युएल सिम मध्ये

Published On: Sep 12 2018 11:07AM | Last Updated: Sep 12 2018 11:30AMनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

श्री गणेशाच्या आगमन झाले असतानाच I Phone च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. आता आयफोन  नव्या ढंगात येत आहे आणि त्यासोबत ड्युअल सिमची सुविधाही वापरकर्त्यांना मिळणार आहे. आजच (१२ सप्‍टेंबर) हे तीन नवे I Phone प्रोडक्‍टस लॉन्‍च झाले असून ते बाजारात दाखल होत आहेत. 

ॲपलचे पूर्वीचे सर्व आय फोन सिंगल सिम होते. त्यामुळे वापरकर्त्यांमध्ये ड्युअल सिमबाबत उत्‍सुकता होती. ॲपलने ग्राहकांच्या मागणीची दखल घेत नव्या मॉडेलमध्ये ही सुविधा दिली आहे. याबाबत पूर्वीही चर्चा झाली मात्र आता आय फोन वापरकर्त्यांना प्रत्यक्षात ड्युअल सिम I Phone वापरण्यास मिळणार आहे. 

यावर्षी कंपनीने नवीन ३ मॉडेल लाँच केले आहेत. यातील एक फोन सामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत असणार आहे. iPhone X या फोनला ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल. याबरोबरच आताच्या फोनप्रमाणेच ५.८ इंचाचा डिस्प्ले असलेले iPhone X चे आणखी एक व्हर्जन दाखल होईल. याशिवाय सर्वात महागडा असलेला iPhone X plus हा ६.५ इंचाच्या ओएलईडी स्क्रीनसोबत येईल. 


आयफोनच्या या तिन्हीही व्हर्जनला पुढच्या बाजूने फेस आयडीचे फिचर असेल. त्यामुळे या नव्या फिचरसह आलेला आय फोन ग्राहकांना आता हाताळायला मिळणार आहे.