Wed, Jun 03, 2020 19:29होमपेज › National › काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्‍यांचा खात्‍मा; १ जवान शहीद 

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Published On: May 16 2019 8:34AM | Last Updated: May 16 2019 8:57AM
जम्‍मू काश्मीर : पुढारी ऑनलाईन

जम्‍मू काश्मीरच्या दलीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्‍यांमध्ये झालेल्‍या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या चकमकीमध्ये एक जवानही शहीद झाला. तसेच यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि एक सामान्य नागरिकही जखमी झाला आहे. दरम्‍यान, अजूनही या ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. 

भारतीय सैन्याला दलीपोरामध्ये दहशतवादी लपून बसल्‍याची माहिती मिळाली होती. त्‍यावरून सैन्याच्या संयुक्‍त तुकडीने या ठिकाणी नाकाबंदी करण्यास सुरूवात केली. तसेच या परिसरात दहशतवाद्‍यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळीच दहशतवाद्‍यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला.

यावेळी सरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबाराने चोख प्रत्‍युत्‍तर दिले. यामध्ये तीन दहशतवाद्‍यांना कंठस्‍नान घालण्यात यश मिळाले. मात्र या कारवाईमध्ये एक जवान शहीद झाला. तसेच तीन जवान आणि एक सामान्य नागरिक जखमी झाला आहे. यातील जखमींना आर्मीच्या बेसकॅम्‍पमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्‍यान सध्या पुलवामामध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.