Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › National › मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या आजम खान यांनी माफी मागावी: अमित शहा

मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या आजम खान यांनी माफी मागावी: अमित शहा

Published On: Apr 15 2019 2:55PM | Last Updated: Apr 15 2019 2:55PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

समाजवादी पक्षाचे महासचिव आजम खान यांची रविवारी पुन्हा एकदा जीभ घसरली. एका जाहीर सभेत भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री जया प्रदा यांच्यावर अश्लिल शेरेबाजी केली. या पार्श्वभूमीवरून भाजपने खान यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही अजम यांनी जया प्रदांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

शहा म्हणाले आझम खान यांनी जया प्रदा यांच्यावर अश्लिल शेरेबाजी केली आहे. हा अपमान केवळ जया प्रदा यांचा  नसून देशातील सर्व माता-भगिनींचा अपमान आहे. राहुल गांधी, मायावती आणि अखिलेश यादव यांनी त्यांचा मुद्दा स्पष्ट करावा. मातृशक्तीचा असा अपमान केल्या प्रकरणी सपा, बसपा आणि आजम खान यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी शहा यांनी केली. 

रविवारी रामपूर येथे झालेल्या जाहीरसभेत आजम खान यांनी भाजप उमेदवार जया प्रदा यांच्यावर निशाणा साधताना त्यांची जीभ घसरली. १७ दिवसांत मी प्रदा यांना ओळखले आहे, असे म्हणत अशोभनीय वक्तव्य केले. याप्रकरणी त्यांच्यावर शाहबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.