Tue, Oct 24, 2017 16:55होमपेज › National › अमित शहांची राहुल यांच्यावर कडवट टीका

'इथे कोणी ऐकत नाही, आणि अमेरिकेत भाषणबाजी'

Published On: Sep 13 2017 7:41PM | Last Updated: Sep 13 2017 7:41PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यानंतर आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यावर टीका केली आहे. अमित शहा यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांचा अपयशी नेता असा उल्लेख केला आहे. देशात त्यांचे कोणी ऐकत नाही, त्यामुळे ते अमेरिकेत जाऊन भाषण देत आहे, अशी टीका शहा यांनी केली आहे. 


अमित शहा सध्या तीन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला. 


राहुल यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात केलेल्या भाषणात केंद्र सरकारवर टीका केली होती. त्याला शहा यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीपेक्षा आमचे सरकार वेगळे आहे. आमचे सरकार कामगिरी करण्यावर विश्वास ठेवते. भाजपने कामे करण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार केली आहे. पण, आपल्याकडील काही नेते अमेरिकेत जातात आणि तेथे भाषणे देतात, अशी टीका शहा यांनी केली आहे.