Sun, Jan 19, 2020 16:38होमपेज › National › ...आणि कोर्टाने दिली बलात्कार पीडित मुलीला गर्भपातास परवानगी! 

...आणि कोर्टाने दिली बलात्कार पीडित मुलीला गर्भपातास परवानगी! 

Published On: Jul 20 2019 10:19AM | Last Updated: Jul 20 2019 10:19AM
लखनौ : पुढारी ऑनलाईन

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने बलात्कार पीडित एका अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, खंडपीठाने गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाला म्हटले आहे की, भ्रुणाचे अवशेष जतन करून ठेवावेत जेणेकरून गरज पडल्यास वैज्ञानिक तपासणीसाठी तो उपलब्ध होऊ शकतो.

न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती आलोक माथूर यांच्या खंडपीठाने बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला आहे. पीडितेवर बलात्कार झाला. यामुळे अल्पवयीन मुलगी २१ आठवड्यांची गरोदर आहे. संपूर्ण जीवनभर न विसरणारी ही घटना आहे. यामुळे तिला मुलाला जन्म द्यायचा नाही, असे याचिकेत नमूद केले होते. 

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी तिच्या वडिलांच्या वयाच्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलीची शारिरीक आणि मानसिक स्थिती लक्षात घेऊन गर्भपात करता येतो की नाही, हे पाहण्यासाठी न्यायालयाने १७ जुलै रोजी डॉक्टरांचे एक पॅनेल गठित करण्याचे निर्देश लखनौ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीला दिले होते. 

या प्रकरणी मेडिकल युनिव्हर्सिटीचे वकील अभिनव त्रिवेदी यांनी गेल्या गुरुवारी न्यायालयात पॅनेलचा अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायालयाने पीडित मुलीला गर्भपात करण्यास परवानगी दिली.