Fri, May 29, 2020 12:05होमपेज › National › मॉब लिंचिंग : पेहलू खान हत्या प्रकरणातील सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

मॉब लिंचिंग : पेहलू खान हत्या प्रकरणातील सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

Published On: Aug 14 2019 6:51PM | Last Updated: Aug 14 2019 6:54PM

file photoजयपूर : पुढारी ऑनलाईन

राजस्थानमधील अलवर येथील जिल्हा न्यायालयाने पेहलू खान मॉब लिंचिंग प्रकरणातील सहा संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे.   

अलवर जिल्ह्यात पेहलू खान यांची गायींच्या तस्करीच्या संशयावरून जमावाने हत्या केली होती. पेहलू खान प्रकरणातील सहा आरोपींची राजस्थान पोलिसांनी निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर खान यांच्या कुटुंबाने हत्येप्रकरणी न्यायालयीन कारवाईची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने देखील संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे.

पेहलू खान (वय ५५) यांच्यासह त्यांचे दोन मुलगे आणि अन्य काहीजण जयपूर येथून गायींची वाहतूक करत होते. या दरम्यान गोरक्षकांनी त्यांना १ एप्रिल २०१७ रोजी मारहाण केली होती. या मारहाणीनंतर पेहलू खान यांचा उपचारादरम्यान ४ एप्रिल रोजी रुग्णालयात मृत्यू झाला होता.

या प्रकरणी बेहरोर पोलिस स्थानकात सात जणांविरोधात एफआयआर नोंदविले होते. त्यानंतर या घटनेचा तपास करून खान यांच्या हत्येप्रकरणी विपीन रवींद्र, कालू राम, दयानंद आणि योगेश कुमार यांच्या विरोधात ३१ मे २०१७ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात गोलिया आणि भीम राठी यांनीही आरोपी बनविले होते. या प्रकरणी ४७ साक्षीदारांच्या जबान्या नोंदविल्या.

या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश प्रथम (एडीजे) यांनी अंतिम सुनावणी पूर्ण करून ७ ऑगस्ट रोजी निकाल राखून ठेवला होता.