Tue, Oct 24, 2017 16:52होमपेज › National › टाटा टेलीची एअरटेलकडून खरेदी

टाटा टेलीची एअरटेलकडून खरेदी

Published On: Oct 12 2017 6:57PM | Last Updated: Oct 12 2017 6:57PM

बुकमार्क करा

नवी दिल्‍ली: वृत्तसंस्था

टाटा सन्सने आपला मोबाईल व्यवसाय भारतीय एअरटेलला विकला असून यामुळे एअरटेलच्या ग्राहक संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होणार आहे. जिओच्या आगमनानंतर मोबाईल सेवा क्षेत्रातील हे दुसरे मोठे विलिनकरण आहे. यापूर्वी व्होडाफोन आणि आयडिया यांचेही विलिनीकरण झाले होते. टाटा टेलिसर्व्हिसचेच ४ कोटी ग्राहक आता एअरटेलचे होतील. 

याशिवाय टाटा टेलिसर्व्हिसेसचा स्पेक्ट्रमही एअरटेलला मिळणारअसून त्यामुळे त्यांच्या ४ जी सेवेचे क्षेत्रही मोठया प्रमाणावर वाढणार आहे. याबाबत एअरटेलने टाटाचे कोणतेही कर्ज डोक्यावर घेतले असून कोणतीही रोख रक्‍कम दिलेली नाही.  टाटा टेलिसर्व्हिसेसकडून दूरसंचार विभागाला देण्यात येणारी  स्पेक्ट्रमची १० हजार कोटी रक्‍कम एअरटेल भरणार आहे.  ‘अतिरिक्‍त स्टेक्ट्रम मिळाल्याने आम्हाला व्यवसायाचा विस्तार करता येईल, असे भारती एअरटेलेच सुनील मित्तल यांनी म्हटले आहे.