Thu, Sep 21, 2017 23:20होमपेज › National › अहमदाबाद : पंतप्रधान मोदी-शिंजो ॲबे यांचा भव्‍य रोड शो  

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा भारत दौरा

Published On: Sep 13 2017 4:49PM | Last Updated: Sep 13 2017 4:52PM

बुकमार्क करा

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन 

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी बुधवारी भारतात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे आणि पत्नी  आकी आबे यांचे स्वागत केले. त्यानंतर भारतीय लष्कराने शिंजो आबे यांना गॉर्ड ऑफ ऑनर दिला. 

जपानचे पंतप्रधान आबे भारत-जपान यांच्यात होणाऱ्या परिषदेसाठी भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर आबे यांचे स्वागत केले. त्यानंतर अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत मोदी आणि आबे यांचा रोड शो झाला. रोड शोदरम्यान अहमदाबादकरांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन आबे यांचे स्वागत केले. 

साबरमती आश्रमात मोदींनी शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नी आकी आबे यांना आश्रमाची ओळख करुन दिली. मोदींनी त्यांना महात्मा गांधींचा चरखा, गांधींच्या तीन माकडांबाबतची माहिती दिली. त्यानंतर आश्रम तटावर मोदींनी आबे यांना साबरमती रिव्हर फ्रंटबाबतची माहिती दिली.   

महत्वाकांक्षी प्रकल्पाचा होणार शुभारंभ

पंतप्रधान शिंजो आबे यांच्या भारत दौऱ्यात देशातील पहिल्या व महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ याचे भूमिपूजन केले जाणार आहे. जपानच्या सहकाऱ्याने सुरु होणाऱ्या या प्रकल्पाची किंमत १.८ लाख कोटी इतकी आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.