Fri, Sep 20, 2019 06:47होमपेज › National › पी. चिदंबरम यांची मध्यरात्री झाली चौकशी, आज कोर्टात हजर करणार

पी. चिदंबरम यांची मध्यरात्री झाली चौकशी, आज कोर्टात हजर करणार

Published On: Aug 22 2019 9:53AM | Last Updated: Aug 22 2019 10:00AM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृह तथा अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने काल रात्री त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानात नाट्यमयरित्या अटक केली. त्यानंतर त्यांना सीबीआय मुख्यालयात नेले. त्यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच चौकशी केली. त्यांना आज राउज ऐवेन्यू येथील सीबीआय कोर्टात हजर केले जाणार आहे. सीबीआयकडून त्यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच ईडीकडूनही कोर्टात चिदंबरम यांना ताब्यात घेण्याची मागणी केली जाणार असल्याचे समजते. 

दरम्यान, दुसरीकडे काँग्रेसकडून आज पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. तर चिदंबरम आज पुन्हा जामिनासाठी याचिका दाखल करणार आहेत.

अशी घालविली रात्र...

चिदंबरम यांना अटक केल्यानंतर सीबीआय मुख्यालयात रात्रीच त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. या दरम्यान त्यांना रात्रीच्या जेवणासाठी विचाण्यात आले. मात्र, चिदंबरम यांनी काहीही खाण्यास नकार दिला. सीबीआयचे एक अधिकारी रात्री त्यांच्या सोबत थांबले. 

असे विचारले प्रश्न...

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांना काही प्रश्न विचारले. कार्ती आणि इंद्राणी मुखर्जी यांची भेट कशी झाली? घोटाळ्याचा पैसा कुठून आला? असे काही प्रश्न त्यांना विचारण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला अटक करण्यात आल्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना असून चिदंबरम यांच्या अटकेने काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे.
  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex