Tue, Jul 23, 2019 12:48होमपेज › National › आजम खान जिंकले तर  लोकशाहीचे काय होईल ?

आजम खान जिंकले तर  लोकशाहीचे काय होईल ?

Published On: Apr 16 2019 2:14AM | Last Updated: Apr 15 2019 9:34PM
नवी दिल्‍ली : जाहीर सभेत भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर अश्‍लील टीका केली आहे. त्यांच्या याच टीकेला जयाप्रदा यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. 

जयाप्रदा म्हणतात की, ‘समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांनी केलेली टीका माझ्यासाठी नवीन नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2009 साली मी समाजवादी पार्टीची उमेदवार होते. त्यावेळीसुद्धा त्यांनी माझ्या विरोधात वक्‍तव्य केल्यानंतर कोणी मला पाठिंबा दिला नव्हता. मी एक महिला आहे. आजम खान जे बोलले, ते मी पुन्हा बोलू शकत नाही. मी त्यांचे काय वाईट केले आहे ते मला समजत नाही. 

आजम खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. कारण हा माणूस निवडणूक जिंकला तर लोकशाहीचे काय होईल? समाजामध्ये महिलांना स्थान उरणार नाही. आम्ही कोठे जायचे? मी मेल्यानंतर तरी तुम्हाला समाधान मिळणार का? तुम्हाला काय वाटते, मी घाबरून रामपूर सोडून निघून जाईन? मी रामपूर सोडणार नाही’, असे जयाप्रदा यांनी सांगितले.विविध राजकीय पक्षांचा प्रवास करून जयाप्रदा यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. त्या रामपूर मतदारसंघातून आजम खान यांच्या विरोधात लोकसभा लढवत आहेत.