लॉकडाऊननंतर काय... लोकांनी देव ठेवला शेवटच्या स्थानी

Last Updated: May 18 2020 4:17PM
Responsive image

एक-एक करुन लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. आता तरी लॉकडाऊन उठेल असे आपल्याला वाटले होते. मात्र चौथा लॉकडाऊन सुरू झाला आहे. पण, एक ना एक दिवस लॉकडाऊन उठेल त्यानंतर लोकांना पहिल्यांदा काय करायचे आहे ते पाहूयात...
 


लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय कराल असा प्रश्न विचारल्यावर मजेशीर उत्तरे ऐकायला मिळालीत. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत सर्वेक्षण केले. त्यावेळी त्यांना याची विविध उत्तरे मिळाली. प्रत्येकाने आपापल्या प्राधान्यक्रमानुसार नेमकं काय करायला आवडेल याची माहिती दिली.

कोरोनाचा प्रभाव किती मोठा आहे याचाच प्रत्यय या सर्वेक्षणामध्ये आढळल्याचे दिसते. कारण जरी लॉकडाऊन उठला तरी सर्वाधिक लोकांनी बाहेर पडण्याऐवजी घरीच राहायला आवडेल असे सांगितले. विशेष म्हणजे सुमारे ३४ टक्के लोकांनी लॉकडाऊन उठला तरी घरीच राहणे पसंत करु असे म्हटले आहे. यावरुन कोरोनाची भीती किती लोकांच्या मनात घर करुन राहिली आहे हे दिसते. लोकांना बाहर पडण्याची मुभा दिली तरी ते बाहेर पडण्यासाठी इच्छूक नसल्याचे दिसते. कारण जर घराबाहेर पडले आणि कोरोनाने आपल्याला गाठले तर काय, अशी भीती लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर आहे. 

यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येते ती शारीरिक स्वच्छता आणि टापटीप. लोकांना घरी राहिल्याने डोक्यावरील आणि दाढीचे केस नकोसे झालेत. महिलांनाही अनेक दिवस पार्लरमध्ये न गेल्याने कसेतरीच होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुटल्यावर पहिल्यांदा सलूनमध्ये जाणार असल्याचे तब्बल २० टक्के लोकांनी सांगितले आहे. एकूणच काय तर व्यक्तीगत स्वच्छता आणि टापटिपीकडे लोकांचा ओढा सर्वाधिक असल्याचे दिसून येते. व्यक्तीगत सुरक्षिततेनंतर पहिला पर्याय लोकांना वाटतो तो म्हणजे व्यक्तीगत स्वच्छता आणि टापटिप. त्यामुळे लॉकडाऊननंतर पहिल्यांदा धाव घेणार ते सलूनकडे असे सर्वाधिक लोकांनी सांगितल्याचे दिसते.

तिसऱ्या क्रमांकावर येतात ते नातेवाईक आणि मित्र. माणूस हा सामाजिक प्राणी आहे असे म्हणतात. त्याला एकट्याने राहायला आवडत नाही. कुठेतरी जावे, कुणालातरी भेटावे, मनातील गोष्टी-अनुभव-भावना शेअर कराव्या वाटतात. ही मानवी ओढ तिसऱ्या क्रमांकावर आलीय. लॉकडाऊन उठल्यावर १९ टक्के लोकांनी मित्रांना आणि नातेवाईकांना भेटायला जाणार असल्याचे सांगितले आहे. आपल्या माणसांना भेटण्याची त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारण्याची गेले अनेक दिवस मारून ठेवलेली भावना या कालावधीत जास्तच उफाळून आल्याचे दिसून येत आहे. त्यापाठीमागे सामाजिक भावनेच्या मानवी मानसिकतेचा पैलू दडल्याचे दिसून येते. त्यामुळे लोक मित्रांना किंवा नातेवाईकांना भेटायला आतूर झाल्याचे दिसून येते.

खवय्येगिरीचा किंवा शॉपिंगचा नंबर तब्बल चौथा असल्याचे दिसून आले.  फक्त १५ टक्के लोकांना त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारायचा आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश घरोघरी विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवानी अनेकांना मिळालेली दिसतेय. त्यामुळे जिभेचे चोचले लॉकडाऊनमध्ये अनेकांनी पुरवल्याचे ढिगभर मेसेज फोटो सोशल मीडियावर गेल्या दीड महिन्यांपासून फिरताना तुम्ही पाहिले असतील. तरीही आपल्या आवडत्या हॉटेलमधील आवडती पदार्थ मिस केल्याची भावना ही काही कमी नाही. त्यामुळेच की काय लॉकडाऊन उठल्यावर जेव्हा हॉटेल सुरू होतील, त्यावेळी आवडीच्या पदार्थावर १५ टक्के लोकांना ताव मारण्याची घाई झाली आहे. आवडीचे पदार्थच नाही तर कोपऱ्यावरच्या टपरीवरील प्रसिद्ध चहा पिण्याची तल्लफ अनेकांना या कालावधीत मारावी लागली आहे. त्यांना या फक्कड चहाचा आस्वाद घ्यायलाही घाई झाली आहे असेच म्हणावे लागेल.

सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे ती पाचवी गोष्ट आहे. सर्वात कमी लोकांना हा लॉकडाऊन सुटल्यानंतर देवदर्शन घ्यायचे आहे. लॉकडाऊन उठल्यावर देवदर्शन घेण्यासाठी फक्त १२ टक्के लोक उत्सुक आहेत. धार्मिक स्थळाला भेट देण्याची इच्छा खूप कमी झाल्याचे यावरुन दिसून येते. वास्तविक लॉकडाऊनच्या काळात समाजातील खरे देव लोकांनी पाहिलेत. आपला रक्षणकर्ता कोण आहे. ते लोकांना कदाचित या लॉकडाऊनमध्ये कळले असावे. हा रक्षणकर्ता कोणत्याही धार्मिक स्थळी नाही अशी भावना लोकांच्या मनात यातून निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कदाचित देवाला लोकांनी सर्वात शेवटच्या स्थानावर टाकले असावे. 

तुम्हाला लॉकडाऊन उठल्यावर काय करावे वाटते ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. 

- अभ्युदय रेळेकर

'तो' कोरोना रुग्ण गेला कुणीकडे? केईएम प्रशासनाचा निष्काळजीपणा सुरुच!


'कोरोना अदृष्य पण, त्याचा सामना अपराजित कोरोना वॉरियर्सशी'


तुम्ही एकटे नाही! अमेरिकेतील आंदोलनाला गुगलचा खंबीर पाठिंबा


नागपूरातील कोरोना कंट्रोलचा मुंडे पॅटर्न; अर्ली ट्रेसिंग, मास क्वारंटाईन, टीम मॅनेजमेंट


तब्बल ८ पावसाळी नक्षत्रांची सुरुवात रविवारीच! 


संगीतकार वाजिद यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?


सातारजवळ एकाचा डोक्यात दगड घालून खून


पाससाठी तब्बल २३ वेळा अर्ज करणारा बहाद्दर सापडला जाळ्यात!


पुण्यात बाधितांची वाटचाल आठ हजारांकडे 


भारतात एकाच दिवसात पुन्हा एकदा ८ हजार प्लस बाधित; दोन लाखांकडे वेगाने वाटचाल