सुन्नी वक्फ बोर्ड पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही

Last Updated: Nov 09 2019 5:20PM
Responsive image
उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. या निर्णयावर सुन्नी वक्फ बोर्डाने आपली भूमिका मांडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी यांनी माध्यमांसमोर मत मांडत, ऐतिहासिक अशा अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो. उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयाचा कोणताही आढावा घेणार नाही किंवा कोणतीही पुर्नयाचिका दाखल करणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. 

जफर फारुकी म्हणाले की, अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरील पुर्नविचार याचिकेवर जर कोणी बोलत असेल तर त्या व्यक्ती अथवा संस्थेचा सुन्नी वक्फ बोर्डाशी काहीच संबंध नाही. ५ एकर जागेच्या मुद्द्यावर बोर्डाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. जागेच्या निर्णयाबाबत बोर्डामध्ये चर्चा सुरू आहे. एमआयएम पक्षाचे खासदार खासदार असदुद्दीन ओवेसी हे बोर्डाचे सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांच्या ‘५ एकर जमीन नाकारली पाहिजे’ या विधानाला काही अर्थ नाही.

बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी म्हणाले की, मी कोर्टाचा निर्णय स्वीकारला आहे. मी आनंदी आहे. मी देशवासियांना शांतता व सुसंवाद राखण्याचे आवाहन करतो. हा निर्णय सर्व लोकांनी स्वीकारला पाहिजे, असे म्हटले आहे.

यापूर्वी शिया धर्मगुरू मौलाना काल्बे जवाद म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला नम्रपणे स्वीकारतो. मुसलमानांसह मोठ्या संख्येने लोकांनी हा निर्णय स्वीकारला आणि आता हा वाद संपला आहे. याबद्दल मी अल्लाहचे आभारी आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा अधिकार असला, तरी आता हे प्रकरण संपले पाहिजे, असे मला वाटते.

अयोध्या वादाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अलीगड, कानपूर आणि मुझफ्फरनगरमधील इंटरनेट सेवा शुक्रवारी रात्रीपासून २४ तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील सुरक्षा संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्णयाच्या संदर्भात राज्यात ९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

काल इटलीला, आज स्पेनला मागे टाकले; भारतात कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ सुरुच!


धुळ्यात आणखी २० रुग्णांची भर


पन्हाळा : गाडीला धडकून जखमी झालेल्या रान मांजराला जीवदान (video)


भाजप नेते कपिल मिश्रांच्या भडकावू भाषणांमुळे दिल्ली हिंसाचाराला प्रोत्साहान : मार्क झुकेरबर्ग


जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर


'कोळसा खाणींचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल'


भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चा निष्फळ


रक्तबंबाळ, भुकेने व्याकुळ होऊन चालत घरी गेलेल्या मजुरांसाठी आता 'पायघड्या'


औरंगाबादेत आज झाली ६४ रुग्णांची वाढ


तासगाव : पेड गावात मुंबईवरून आलेल्या तरूणाला कोरोना