Wed, Sep 18, 2019 21:41होमपेज › National › केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी विजयोत्सव

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी विजयोत्सव

Published On: May 23 2019 11:39PM | Last Updated: May 24 2019 12:03AM
नवी दिल्ली : प्रतिनिधी

देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षाचा धुव्वा उडवून दिला. यानंतर देशात सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव सुरु आहे. 

नागपूर मतदार संघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तब्बल दोन लाख मतांनी विजयी झाले आहेत. गडकरी यांच्या विजयाने त्यांच्या घरी विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गडकरी यांना सौ. कांचन गडकरी यांनी औक्षण केले. तर भाजपच्या या अभूतपूर्व यशाबद्दल नितीन गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते.