Sun, Jul 05, 2020 03:45होमपेज › National › दिल्लीत हिंसाचार पसरवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर; ५० मोबाईल जप्त

दिल्लीत हिंसाचार पसरवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर; ५० मोबाईल जप्त

Last Updated: Feb 27 2020 3:05PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राजधानीत हिंसाचार घडवण्यासाठी समाज माध्यमांचा पुरेपूर वापर करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. अनेक व्हॉट्सअँप ग्रुप त्यासाठी बनवण्यात आले होते. याच ग्रुपच्या मदतीने विविध व्हिडिओ शेअर करून लोकांच्या भावना चेतावण्यात आल्या. ग्रुपमधून​ चिथावणीखोर मेसेजेसही फॉरवर्ड करण्यात आले होते. दोन्ही गटांकडून असे ग्रुप तयार करण्यात आले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत ५० मोबाईल फोन जप्त केले आहेत. उत्तर प्रदेश लगतच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात देशी कट्टे आणण्यात आले. हिंसाचारात जमावाकडून कट्टयांचा वापर करण्यात आला. व्हॉट्सअँप ग्रुपच्या मदतीनेचे स्थानिकांनी सीमेलगत असलेल्या गुन्हेगारांना बोलावून घेतले होते, असाही दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. 

तूर्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे स्थानिक नेत्यांच्या सहभागासंबंधी पोलिसांकडून तपास केला जात आहे. सोबतच सायबर सेल फेसबुक तसेच ट्विटरवरून संशयितांच्या लोकशनची माहिती गोळा करीत आहे. हिंसाचारादरम्यान स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्याही सक्रिय झाल्या होत्या, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.