अयोध्या : कोर्टाच्‍या निर्णयाचे गडकरींकडून स्वागत

Last Updated: Nov 09 2019 12:35PM
Responsive image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार, दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल


नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर आज सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. तसेच अयोध्येतच सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर पर्यायी जागा देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने ३-४ महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असा आदेश कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार तसेच दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्‍वागत केले आहे. 

 सर्वांनी सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचा आदर केला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्‍हटले आहे. 

यासोबतच बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी देखील सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे सर्वांनी स्‍वागत केले पाहिजे. हे सामाजिक सलोख्‍यासाठी महत्‍त्‍वाचे आहे. आता यावर वाद नको, असे आवाहन बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. 

सर्व पक्षकांराचे म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर सुप्रीम कोर्टाच्‍या पाच न्‍यायमूर्तींच्‍या घटनापीठाने एकमताने निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे स्‍वागत आहे. बर्‍याच दशकापासून सुरु असलेल्‍या या वादावर सुप्रीम  कोर्टाने आज निर्णय दिला. अनेक वर्षापासून सुरु असलेला वाद आज संपला. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहान दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

 

 

मे महिन्यातच ८२ टक्के कोरोनाग्रस्तांची भर; दोन आठवड्यातच रूग्णसंख्या दुप्पट


कोरोना उपचारासाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार : मंत्री अमित देशमुख


वीस किमीचा पायी प्रवास करत गर्भवतीने दिला चिमुरड्याला जन्म


पीपीई किट उपलब्ध असलेल्या औषध दुकानांची यादी एफडीएकडून जाहीर


कोल्हापुरात नवे २८ रुग्ण, एकूण बाधित ५९०


कोल्हापूर : आजरा तालुक्याला वळवाने झोडपले  


कोल्‍हापुरात पावसाची जोरदार हजेरी 


दिल्ली सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केंद्राकडे मागितली मदत 


चांदोली धरणात ४.८३ टीएमसी पाणीसाठा


यवतमाळ : कोरोनागस्‍त महिलेचा मृत्‍यू; पालकमंत्र्यांचे खुलाशाचे निर्देश