Mon, Jun 01, 2020 21:33
    ब्रेकिंग    होमपेज › National › अयोध्या : कोर्टाच्‍या निर्णयाचे गडकरींकडून स्वागत

अयोध्या : कोर्टाच्‍या निर्णयाचे गडकरींकडून स्वागत

Last Updated: Nov 09 2019 12:35PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार, दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवालनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर आज सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. तसेच अयोध्येतच सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर पर्यायी जागा देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने ३-४ महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असा आदेश कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार तसेच दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्‍वागत केले आहे. 

 सर्वांनी सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचा आदर केला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्‍हटले आहे. 

यासोबतच बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी देखील सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे सर्वांनी स्‍वागत केले पाहिजे. हे सामाजिक सलोख्‍यासाठी महत्‍त्‍वाचे आहे. आता यावर वाद नको, असे आवाहन बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. 

सर्व पक्षकांराचे म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर सुप्रीम कोर्टाच्‍या पाच न्‍यायमूर्तींच्‍या घटनापीठाने एकमताने निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे स्‍वागत आहे. बर्‍याच दशकापासून सुरु असलेल्‍या या वादावर सुप्रीम  कोर्टाने आज निर्णय दिला. अनेक वर्षापासून सुरु असलेला वाद आज संपला. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहान दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.