Thu, May 28, 2020 17:11होमपेज › National › कॅबिनेट बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी

कॅबिनेट बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी

Published On: Jun 12 2019 8:01PM | Last Updated: Jun 12 2019 8:30PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आज तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. माहिती आणि दूरसंचारमंत्री प्रकाश जावडेकर यांनी  कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची माहिती देताना याबाबतची माहिती दिली आहे. 

मुस्लिम महिलांचा विचार करून मोदी सरकार आगामी संसद सत्रात तीन तलाकचे विधेयक सादर करणार आहे. अध्यादेशाचे कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात येणार आहे. तसेच कॅबिनेटने ‘जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०१९’ ला मंजुरी दिली आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागातील नागरिकांना मदत होणार आहे. 

जम्‍मू आणि काश्मीरमध्ये लागू असलेल्‍या १९५४ च्या राष्‍ट्रपतींच्या आध्यादेशामध्येही केंद्रीय मंत्रीमंडळाने बदल केला आहे. या बदलामुळे नियंत्रण रेषेवर राहणाऱ्या नागरिकांसोबतच आंतरराष्‍ट्रीय सीमेवर राहणाऱ्या नागरिकांनाही आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. आता पर्यंत फक्‍त प्रत्‍यक्ष ताबा रेषेवर राहणाऱ्या नागरिकांनाच आरक्षणाचा लाभ मिळत होता. जम्‍मूच्या काही भागातील नागरिकांनाही याचा लाभ मिळणार आहे. शिवाय आर्थिक मागासांना मिळणाऱ्या दहा टक्‍के आरक्षणासह एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणही मिळणार आहे. 

विद्यापीठ नियुक्‍तीवरुनही मोदी सरकारने रोस्‍टर वादावर मोठा निर्णय घेतल्‍याची माहिती जावडेकर यांनी दिली.