Thu, Jan 17, 2019 08:08होमपेज › National › ‘वॉव!’ अमेरिकेचे विमानतिकीट फक्‍त १३,५००

‘वॉव!’ अमेरिकेचे विमानतिकीट फक्‍त १३,५००

Published On: May 17 2018 2:20AM | Last Updated: May 17 2018 2:19AMनवी दिल्‍ली : प्रतिनिधी

आईसलँडच्या ‘वॉव एअर’ या विमान कंपनीने भारतात प्रवेश केला असून अमेरिकेला फक्‍त 13 हजार 500 रुपयांत नेण्याची योजना सादर केली आहे. या योजनेचा प्रारंभ 7 डिसेंबरपासून होणार आहे. वॉव एअरलाईन्सने केवळ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आखलेली नाही तर आमची तिकिटे इतर कंपन्यांच्या तुलनेत नेहमीच स्वस्त असतील, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कूली मोगेन्सन यांनी सांगितले.

काही विमान कंपन्या जून महिन्यात भारतातून अमेरिकेत जाण्यासाठी स्वस्त तिकिटाची ऑफर देतात. मात्र या बहुतेक कंपन्यांची तिकिटे 30 हजारांपेक्षा जास्त किमतीची आहेत.