नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटार वाहन (सुधारणा) विधेयकास मंगळवारी मंजुरी दिली असून, हे विधेयक मंजुरीसाठी संसदेत मांडले जाणार आहे. इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविल्यास 2000 रुपये, हेल्मेटशिवाय दुचाकी चालविल्यास 1000 रुपये दंड व वाहन परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद या विधेयकात आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास सध्या 100 रुपयांचा दंड आकारला जातो, त्यात वाढ करून 500 रुपये दंड करण्यात आला आहे.
मोदी सरकारने वाहतूकविषयक नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोटार वाहन (सुधारणा) विधेयकास मंजुरी दिली आहे. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणार्यास मोठ्या रकमेचा म्हणजे एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न दिल्यास दहा हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.