Sun, Jul 05, 2020 21:20होमपेज › National › सुरक्षा दलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खातमा 

सुरक्षा दलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खातमा 

Last Updated: May 30 2020 10:44AM
श्रीनगर : पुढारी वृत्तसेवा 

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलाला येथील वानपोरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्त सुचना मिळाली होती. त्याआधारे सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिम होती घेतली होती. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी घाटीत दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई तीव्र केली आहे.

सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत दोन दहशतवाद्यांचा खातमा करत शस्त्रे जप्त केली आहेत. पाच दिवसांत कुलगाममधील हे दुसरे ऑपरेशन आहे. यापूर्वी मांजगाम भागात सुरक्षा दलाच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.

देशातील कोरोना उद्रेक सुरुच; बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ!

दक्षिण काश्मीरमधील वनपुरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर हा परिसराची घेराबंदी करण्यात आली होती. त्यानंतर या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ज्यावेळी शोध मोहिम प्रगतीपथावर होती त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीवार सुरू केला. त्याच्या प्रत्यारात आम्हालाही गोळी चालवावी लागली. खबरदारी म्हणून अजूनही शोध मोहिम सुरू आहे