Tue, Sep 17, 2019 22:01होमपेज › National › 'ही' निवडणूक माझ्या जीवनातील तीर्थयात्रा :  नरेंद्र मोदी 

'ही' निवडणूक माझ्या जीवनातील तीर्थयात्रा :  नरेंद्र मोदी 

Published On: May 25 2019 8:15PM | Last Updated: May 25 2019 8:34PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

जेव्हा विश्वासाचा धागा मजबूत होतो; तेव्हा सत्ताधारी पक्षाची लाट येते. ही लाट विश्वासाच्या धाग्याशी बांधलेली आहे. ही निवडणूक सकारात्मक मतांची आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत संबोधित करताना व्यक्त केले.

मी अनेक निवडणुका पाहिल्या. पराभव, विजय अनुभवले. मात्र, २०१९ मधील निवडणूक ही माझ्या जीवनातील तीर्थयात्रा आहे, असे त्यांनी म्हटले.

अल्पसंख्याकांना आतापर्यंत छळ आणि भीतीच्या छायेखाली ठेवले. आता यापुढे असे होऊ दिले जाणार नाही. संविधानाला साक्षी मानून आम्हाला संकल्प करायचा आहे की, देशातील सर्व घटकांना नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव होणार नाही. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, हा आमचा मंत्र आहे, असे ते म्हणाले.

लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत भाजपला जेवढे मतदान मिळाले त्यात २०१९ मध्ये वाढ झाली. ही वाढ सुमारे २५ टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माता-बहिणींनी कमाल केली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या संसदेत मोठ्या संख्येने महिला खासदार विराजमान झाल्या. भाष्य, वर्तवणूक, आचार आणि विचार यापासून आपल्याला बदलले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.