Tue, Apr 23, 2019 02:11होमपेज › National › दिल्‍लीतील हॉटेल अर्पित पॅलेसला भीषण आग, मृतांचा आकडा १७ वर

दिल्लीत हॉटेलला भीषण आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू

Published On: Feb 12 2019 8:02AM | Last Updated: Feb 12 2019 10:06AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

नवी दिल्‍लीतील करोलबाग परिसरातील हॉटेल अर्पित पॅलेसला भीषण आग लागली आहे. या आगीत १७ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. आग विझविण्यासाठी  अग्निशमन दलाच्या २६ गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍या आहे. हॉटेलमध्ये आणखी काही लोक अडकल्‍याची भीती व्यक्‍त केली जात आहे. 

हॉटेलच्या शेवटच्या मजल्‍यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्‍न करत  आहेत. हॉटेलमध्ये आडकलेल्‍या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार मंगळावारी पहाटे ५ वाजता शॉर्टसर्कीट झाल्‍याने ही आग लागली आहे. 

अग्निशमन दलाचे जवान हॉटेलमधील प्रत्‍येक रुमची तपासणी करुन आत आणखी काही लोक आहेत का? याची पाहणी करत आहेत. हॉटेलमध्ये एकूण ४५ रुम असून त्‍यातील ४० रुम बुक आहेत.