Thu, Jan 17, 2019 08:04होमपेज › National › कर्नाटक निवडणूकः सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

कर्नाटक निवडणूकः सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Published On: May 17 2018 2:13AM | Last Updated: May 17 2018 2:40AMनवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन 

कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून रात्री पाऊणे दोन वाजता या प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. 

लाईव्ह अपडेट

* सर्वात जास्त जागा मिळालेल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावले आहे. काँग्रेस/जनता दलाची आघाडी निवडणूकीनंतर झाली आहे- न्यायालय

*बहुमतासाठी ११२ आमदारांची गरज आहे, भाजपकडे १०४ आमदार असताना त्यांना १५ दिवसांची मुदत कशी काय दिली त्यामुळे घोडेबाजारच होणार, काँग्रेस/जनता दलाकडे ११६ आमदारांचे संख्याबळ आहे - सिंघवी 

* भाजपकडे फक्त १०४ आमदार आहेत, काँग्रेस आणि जनता दलाकडे बहुमत आहे - सिंघवी

*  काँग्रेसचे वकील अभिषेक सिंघवी यांनी विचारले की, भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसताना ते बहुमत कसे सिद्ध करणार 

* काँग्रेस आणि जनता दलाकडे बहुमत असल्याने त्यांना सरकार बनवण्याची संधी द्यायला हवी- सिंघवी

कर्नाटकात भाजपच्या बी. एस. येड्डीयुरप्पांचा शपधविधी रोखावा. तसेच काँग्रेस- जनता दल सेक्युलर यांच्या आघाडीला सत्ता स्थापनेचे राज्यपालांनी निमंत्रण द्यावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाही. बहुमतासाठी ११२ आमदारांची आवश्यकता आहे. पण भाजपकडे १०४ आमदार आहेत. तर काँग्रेस-जनता दल सेक्युलर यांचे मिळून ११६ आमदार आहेत. यामुळे बहुमत आमच्याकडे असल्याने सत्ता स्थापनेसाठी आम्हाला निमंत्रण दिले गेले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस-जनता दल सेक्युलरने केली आहे. 

सरन्यायाधीशांनी या प्रकरणी एका खास पीठाची नियुक्ती केली आहे. यामध्ये न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांचा समावेश आहे.