इंडिया शब्द हटविण्याची विनंती; याचिकेची दखल घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Last Updated: Jun 03 2020 6:51PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

घटनेतून इंडिया शब्द हटविण्याची विनंती करणाऱ्या याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. इंडिया शब्द गुलामीची निशाणी असल्यामुळे हा शब्द हटविला जावा, असे याचिकेत म्हटले होते. 

सदर याचिकेला रिप्रेझेंटेशनच्या स्वरूपात मानले जाऊ शकते व सरकारला एक निवेदन दिले जाऊ शकते, अशी टिप्पणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणीदरम्यान केली. घटनेत आधीपासूनच भारत शब्द वापरण्यात आलेला असल्यामुळे आम्ही याचिकेवर काहीही करू शकत नाही, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी सांगितले. 

भारत अर्थात इंडिया राज्यांचा संघ असेल, असे परिच्छेद १ मध्ये म्हटलेले आहे. घटनेतील परिच्छेद १ मध्ये दुरुस्ती करून इंडिया शब्द हटविला जावा. याजागी केवळ भारत अथवा हिंदुस्थान शब्द वापरला जावा, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. इंडिया शब्द गुलामीचे प्रतीक आहे, त्यामुळे हा शब्द वापरणे योग्य ठरणार नाही, असा तर्क देण्यात आला होता. भारत या शब्दाची पार्श्वभूमी पाहिली तर महाराजा भरत यांनी भारताचा पूर्ण विस्तार केला होता आणि त्यांच्या नावाने भारत नाव पडले होते. मध्य युगात तुर्की आणि इराणच्या लोकांनी सिंधु घाटातून भारतात प्रवेश केला, ते लोक स चे उच्चारण ह करत होते आणि यातून सिंधुचा अपभ्रंश हिंदू असा झाला. हिंदू लोकांचा देश म्हणून हिंदुस्थान असे नाव पडले.

जेव्हा इंग्रज आले तेव्हा त्यांनी इंडस सारखा सिंधू घाट म्हणत देशाचे नाव इंडिया केले. इंग्रजांना भारत अथवा हिंदुस्थान म्हणणे अवघड जात होते, त्यामुळे त्यांनी इंडिया म्हणण्यास सुरुवात केली, हाही तर्क दिला जातो.

सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!


राज्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा विक्रम मोडीत


सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'


मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन


कोरोना : राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल


कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला


पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!


शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू


औरंगाबाद : रस्त्यालगतच्या ५१ निराश्रीतांना आसरा


ठाणे जिल्हा १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन