Mon, Aug 26, 2019 08:29होमपेज › National › श्रीलंका बॉम्‍बस्‍फोट : मृतांची संख्‍या ३५९ वर

श्रीलंका बॉम्‍बस्‍फोट : मृतांची संख्‍या ३५९ वर

Published On: Apr 24 2019 11:06AM | Last Updated: Apr 24 2019 11:15AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण जग हादरले. इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेमध्ये झालेल्या आठ साखळी बॉम्बच्या स्फोटात २९० लोकांचा मृत्यू झाला होता. तर ५०० हून अधिक लोक जखमी झाले होते. आता मृत्‍यू झालेल्‍यांची संख्‍या ३५९ वर पोहोचली आहे. त्‍यामध्‍ये ३९ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. मृत्‍यू झालेल्‍यांपैकी काही जणांची ओळख पटवण्‍यात आली आहे, अशी माहिती श्रीलंकेच्‍या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे.  

सतरा मृतदेहांची ओळख पटवण्‍यात आली असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. 

या घटनेचे गांभिर्य ओळखत भारताने सतर्क राहताना अधिक कडक पावले उचलली आहेत. श्रीलंकेला लागून असणाऱ्या सागरी सीमांवर भारतीय तटरक्षक दलास हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सागरी मार्गाने या हल्ल्यातील हल्लेखोर पळून जाऊ नयेत अथवा भारतात घुसू नयेत याची दक्षता भारतीय तटरक्षक दलाने घेतली आहे. यासाठी तटरक्षदलाने आपला बंदोबस्त वाढवला असून अनेक ठिकाणी गस्त घालण्यासाठी डॉनिर्यर विमाने आणि जहाजे तैनात ठेवली आहेत. 

आतापर्यंत ४० संशयित ताब्‍यात 

पोलिस प्रवक्ताने सांगितले की, श्रीलंका पोलिसांनी आणखी १६ संशयितांना ताब्‍यात घेतले आहे. आतापर्यंत अटक करण्‍यात आलेल्‍या संशयितांची संख्‍या ४० झाली आहे.