Sun, Jan 19, 2020 15:33होमपेज › National › 'भाजपच्या १ किंवा २ नंबरच्या नेत्याने सांगितल्यास २४ तासात सरकार पाडू'

'भाजपच्या १ किंवा २ नंबरच्या नेत्याने सांगितल्यास २४ तासात सरकार पाडू'

Published On: Jul 24 2019 12:32PM | Last Updated: Jul 24 2019 4:26PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दोन आठवड्यांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय पेचाची काल, मंगळवारी अखेर झाली. कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी पदाचा राजीनामा दिला. आता कर्नाटकात भाजप सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे.

राजकीय वर्तुळात कर्नाटकातील कमळ ऑपरेशन यशस्वी झाल्याची चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील सरकार पडले तर त्याची जबाबदारी आमची नाही, असे सुचक वक्तव्य केले. तसेच, भाजन नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेतील  विरोधी पक्षनेते गोपाळ भार्गव यांनी कमलनाथ यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला. आम्हाला वरून एक किंवा दोन नंबरच्या नेत्यांचा आदेश आला, तर २४ तास सुद्धा लागणार नाहीत तुमचे सरकार पाडायला अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता कर्नाटकनंतर भाजपचे पुढचे टार्गेट राज्य मध्य प्रदेश असल्याचे संकेत मिळत आहेत. 

मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होण्याची भीती कॉंग्रेस आमदारांना वाटत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सूचक विधान करत राज्यात कॉंग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बसपा-सपामध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही घडल्यास आम्ही काहीही करू शकत नाही,’ असे म्हणत चौहान यांनी अप्रत्यक्षपणे ‘ऑपरेशन लोटस’चे संकेत दिले आहेत. असे संकेत देत ‘आम्ही इथे सरकार पाडणार नाही. काँग्रेस सरकार पडण्यास त्यांचेच नेते जबाबदार आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्यात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे आता भाजपचे यापुढचे लक्ष्य मध्य प्रदेशच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.