Tue, Oct 24, 2017 16:48होमपेज › National › ‘जय शहा यांची चौकशी व्हावी’

‘जय शहा यांची चौकशी व्हावी’

Published On: Oct 13 2017 11:43AM | Last Updated: Oct 13 2017 11:43AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन वृत्त 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाला म्हणजेच जय शहा यांच्या कंपनीला झालेल्या फायद्याची चौकशी व्हावी, अशी मागणी शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. त्यांच्या या मगणीने भाजपला घरचा आहेर मिळाला असून त्यांच्या पूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. 

एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली. या वेळी ते म्हणाले, ‘शहा यांच्या मुलावर इतके गंभीर आरोप लावलेले जात असताना त्यांना पक्षाकडून पाठीशी का घातले जात आहे. जय शहा यांच्या विषयी काय सत्य आहे ते जगासमोर आलेच पाहिजे.’

शहा यांच्या कंपनीच्या प्रामाणिकते विषयी बोलताना सिन्हा यांनी, या प्रकरणात शहा यांनी चौकशीची मागणी मान्य केली पाहिजे, कारण त्यांच्या कंपनीचा व्यवहार जर प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या मुल्यांवर अधारीत असेल त्यांना घबरण्याची काहीच गरज नसल्याचे म्हटले. 

जय शहा यांच्या कंपनीच्या नफ्यात १६००० पटींनी वाढ झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर शहा ज्‍यांनी हे वृत्त देणार्‍या ‘दी वायर’ या संकेतस्थळावर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. या प्रकरणी विरोधकांनी जय शहा यांची भाजपकडून पाठराखण केली जात आसल्‍याचा आरोप केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्ररकरणी बोलावे, अशी मागणी केली.