Thu, Mar 21, 2019 23:40
    ब्रेकिंग    होमपेज › National › 'एसबीआय'ला पहिल्या तिमाहीत ४,८७५ कोटींचा तोटा 

'एसबीआय'ला पहिल्या तिमाहीत ४,८७५ कोटींचा तोटा 

Published On: Aug 10 2018 4:14PM | Last Updated: Aug 10 2018 4:14PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बँकिग सेवा देणाऱ्या देशातील सर्वांत मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) पहिल्या तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे. एसबीआयने आज २०१८-१९ या वर्षातील (एप्रिल- जून) पहिल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली. या काळात बँकेला ४,८७५.७५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे, असे एसबीआयने म्हटले आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ७,७१८.१७ कोटी रुपयांचा तर तिसऱ्या तिमाहीत २,४१६ कोटी तोटा झाल्याचे बँकेने जाहीर केले होते. आता सलग तिसऱ्यावेळा बँकेला तोटा सहन करावा लागत आहे.

गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत २,००५.५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे बँकेने नमूद केले होते. मात्र त्यानंतर बँकेची कामगिरी तोट्यात गेली.

बँकेला तोटा सहन करावा लागला असला तरी बँकेची उलाढाल वाढली आहे.  पहिल्या तिमाहीतील उलाढाल ६५,४९२.६७ कोटींवर पोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत उलाढाल ६२,९११.०८ कोटी होती.
पहिल्या तिमाहीत बँकेच्या ग्रॉस एनपीएमध्येही १०.६९ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ग्रॉस एनपीए १०.९१ टक्के होता. तर नेट एनपीए ५.२९ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी तो ५.७३ टक्के होता, असे नमूद करण्यात आले आहे.