होमपेज › National › प्रियांकाला देशवासियांच्या सेवेसाठी सोपवतो, त्यांना सुरक्षित ठेवा : रॉबर्ट वधेरा

प्रियांकाना सुरक्षित ठेवा : रॉबर्ट वधेरा

Published On: Feb 11 2019 7:56PM | Last Updated: Feb 11 2019 7:56PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

प्रियांका गांधींची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आज, सोमवारी पहिल्यांदाच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये भव्य रोड शो केला. याद्वारे प्रियांका गांधींची राजकारणातील पर्वाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान, त्यांचे पती रॉबर्ट वधेरा यांनी आपल्या पत्नीबाबत एक भावनिक पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली आहे. आजची राजकीय परिस्थिती दुर्भाग्यपूर्ण आहे. मात्र, मला माहिती आहे, लोकांची सेवा करणे तुमचे कर्तव्य आहे, त्यामुळे मी त्यांना भारताच्या लोकांकडे सोपवत आहे. कृपया त्यांना सुरक्षित ठेवा’, अशा स्वरुपाची भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे.

वधेरा यांनी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘आपल्याला उत्तर प्रदेशात काम करण्यासाठी आणि भारतीय जनतेच्या सेवेच्या नव्या प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा. आपण माझी सर्वात चांगली मैत्रीण आहात, एक आदर्श पत्नी आहात आपल्या मुलांसाठी एक चांगली आई आहात. तिकडे खूपच संवेदनशील आणि भ्रष्ट राजकीय वातावरण  आहे.'

भव्य ‘रोड शो’ने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वधेरा यांच्या ‘मिशन यूपी’ मोहिमेला लखनऊमधून आजपासून सुरुवात झाली आहे. प्रियांका यांच्या आगमनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे, प्रियांका यांच्यासोबत या रॅलीत सहभागी होते.

प्रियांका गांधी यांनी लखनऊ विमानतळ ते काँग्रेस कार्यालय दरम्यान १५ किलोमीटर रोड शो केला. या रोड शोच्या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.