Sat, May 30, 2020 10:56होमपेज › National › लोकसभेतील भाजपच्या उपनेतेपदी राजनाथ सिंह

लोकसभेतील भाजपच्या उपनेतेपदी राजनाथ सिंह

Published On: Jun 13 2019 1:29AM | Last Updated: Jun 12 2019 10:25PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची लोकसभा उपनेतेपदी, तर केंद्रीय रेल्वे व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेतील उपनेतेपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळासाठी भाजप संसदीय पक्षाच्या कमिटीचे पुनर्गठन करण्यात आले. लोकसभेतील नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली होती. लोकसभेतील उपनेतेपदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

त्याचप्रमाणे राज्यसभेतील नेतेपदी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांची, तर उपनेतेपदी रेल्वे व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची निवड केली गेली आहे. गोयल हे महाराष्ट्रातून राज्यसभेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी भाजपच्या कोषाध्यक्षपदाचीदेखील जबाबदारी यापूर्वी सांभाळली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात राज्यसभेतील उपनेतेपदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे होती, ते यावेळी लोकसभेत निवडून आल्यामुळे गोयल यांच्याकडे उपनेतेपद सोपविण्यात आले आहे.