Thu, Aug 22, 2019 14:35होमपेज › National › 'सनी देओल फिल्‍मी फौजी, पण मी रिअल फौजी'

'सनी देओल फिल्‍मी फौजी, पण मी रिअल फौजी'

Published On: Apr 26 2019 7:04PM | Last Updated: Apr 26 2019 7:04PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

पंजाबचे मुख्‍यमंत्री कॅप्‍टन अमरिंदर सिंग यांनी बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्‍या भाजप प्रवेशावरुन जोरदार निशाणा साधला.  सनी देओल हा फिल्‍मी फौजी (चित्रपटातील सैनिक) आहे, मात्र मी एक खरा फौजी आहे. आम्‍ही त्‍याला या निवडणुकीत चांगलीच टक्‍कर देणार आहे. त्‍यामुळे गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांना सनी देओलपासून कोणतीच भिती नाही.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलने बुधवारी  संरक्षण मंत्री निमंला सीतरमण व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्‍या उपस्‍थित भाजपमध्‍ये जाहीर प्रवेश केला. २३ एप्रिलला भाजपने सनी देओलना गुरुदासपूर येथून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्‍यात आली आहे. 

गुरुदासपूर येथून सुनिल जाखड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्‍यांच्‍यासोबत अमरिंदर सिंग होते. त्‍यावेळी माध्‍यमाशी संवाद साधताना अमरिंदर सिंग म्‍हणाले की, 'सनी देओल हा फिल्‍मी फौजी (चित्रपटातील सैनिक) आहे, मात्र मी एक खरा सैनिक, फौजी आहे. आम्‍ही त्‍याला या निवडणुकीत चांगलीच टक्‍कर देणार आहे. त्‍यामुळे गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांना त्‍यांच्‍यापासून कोणतीच भिती नाही'. असे म्‍हणत त्‍यांनी जिंकण्‍याबद्दल विश्‍वास व्‍यक्‍त केला. 

अमरिंदर सिंग १९६० मध्‍ये भारतीय सैन्‍यामध्ये कॅप्‍टन होते. सनी देओल बॉलिवूड अभिनेता आहे. सध्‍या त्‍यांनी चित्रपटात काही विशेष कामगिरी केलेली नाही. तसेच अमरिंदर सिंग  पुढे म्‍हणाले की, सनी देओल काय येईल आणि जाईल. सनी देओलने बॉर्डर या चित्रपटात ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपूरीची भूमिका चांगली साकारली होती. मात्र ते खरे सैनिक बनू शकले नाहीत.

यावेळी भाजपने याच आठवड्‍यात पंजाबमधील गुरदासपूर येथून बॉलिवूड अभिनेता सनी देओलला उमेदवारी दिली आहे. यापूर्वीच्‍या निवडणुकीत भाजपकडून  बॉलिवूड अभिनेता विनोद खन्‍ना यांना उमेदवारी देण्‍यात आली होती.