Tue, Jul 23, 2019 18:49होमपेज › National ›  राजस्थान, तेलंगणामध्ये चुरशीने मतदान; उत्सुकता शिगेला 

 राजस्थान, तेलंगणामध्ये चुरशीने मतदान; उत्सुकता शिगेला 

Published On: Dec 07 2018 8:22AM | Last Updated: Dec 07 2018 6:15PM
जयपूर/हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

अत्यंत हीन पातळीवर आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली आणि आगामी लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहण्यात येत असलेल्या पाच राज्यांमधील मतदान आज पार पडले. आज शेवटच्या टप्प्यामध्ये तेलंगणा आणि राजस्थानमध्ये मतदा पार पडले. येत्या ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. 

तेलंगणा या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर के. चंद्रशेखर राव (केसीआर) दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे सलग चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत. 

आंध्र प्रदेशमधून वेगळे होऊन तेलंगणा या स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) सरकार सत्तेवर आले. आता दुसऱ्यांदा टीआरएसचे केसीआर प्रभाव टिकवून ठेवतात की नाही, हे आज मतदार ठरविणार आहेत. निवडणूक प्रचारा दरम्यान भाजप, काँग्रेस आणि अन्य पक्षांनी केसीआर यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना लक्ष्य केले आहे.

राजस्थानमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दिग्गज नेत्यांचे आव्हान आहे. हे दोघेही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी १ हजार ८२१ उमेदवार रिंगणात आहेत. येथे प्रथमच व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर निवडणूक आयोगाने केला आहे

दिवसभरातील अपडेटस 

राजस्थान, तेलंगणामध्ये मतदान पार पडले

राजस्थानमध्ये दुपारी ३ पर्यंत ५९.४३ टक्के मतदान

तेलंगणामध्ये दुपारी ३ पर्यंत ५६.१७ टक्के मतदान

राजस्थान : सीकर-फतेहपूर येथे मतदान केंद्रावर दोन गटात झालेल्या वादानंतर वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. यामुळे मतदान प्रक्रिया ३० मिनिटे थांबली.

राजस्थान : सिकर पालिकेतील मतदान केंद्रावर बोगस मतदान करत असल्याच्या आरोपावरून वाद, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

तेलंगणा : मतदान केंद्रात मतदानानंतर सेल्फी काढल्याप्रकरणी राजेंद्र नगर पोलिस स्थानकात एका मतदारांविरोध गुन्हा नोंद

राजस्थानमध्ये दुपारी १ पर्यंत ४१.५३ टक्के मतदान

तेलंगणामध्ये दुपारी १ पर्यंत ४८ टक्के मतदान  

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी चिंतमडका गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

तेलंगणा : येथील विधानसभा निवडणुकीसाठी हैदराबाद येथील मतदान केंद्रावर जाऊन टेनिसपटू सानिया मिर्झा हिने केले मतदान 

तेलंगणा : अभिनेता चिरंजीवी यांनी हैदराबाद येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. 

राजस्थान : सकाळी ११ पर्यंत २१.८९ टक्के मतदान

राजस्थानमधील मतदान क्रमांक १७२ मधील ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान काहीवेळ थांबविले

राजस्थान : सरदारपूर मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर ९० वर्ष वयाच्या मतदाराला उचलून मतदान करण्यासाठी नेण्यात आले.

तेलंगणा : ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहाद उल मुसलीमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शास्त्रीपूरम येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

तेलंगणामध्ये सकाळी ९.३० पर्यंत १०.१५ टक्के मतदान

राजस्थान : केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी जयपूर येथील वैशाली नगर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी झालरापाटन येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

तेलंगणा : हैदराबाद येथील १५२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले अभिनेते अल्लू अर्जुन.