Thu, Jan 24, 2019 08:39होमपेज › National › पेट्रोल, डिझेलचा किंचित दिलासा

पेट्रोल, डिझेलचा किंचित दिलासा

Published On: Feb 14 2018 1:59AM | Last Updated: Feb 14 2018 1:54AMनवी दिल्‍ली :

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती किंचित कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. दिल्‍ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्‍नई या महानगरांमध्ये मंगळवारी दोन्ही इंधनाच्या किमतीत 6 ते 8 पैशांनी घट झाली. सलग सहाव्या दिवशी ही घट झाली आहे.

सात फेब्र्रुवारीपासून पेट्रोलच्या किमती 43 ते 47 पैशांनी, तर डिझेलच्या किमती 72-77 पैशांनी कमी झाल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलांच्या किमती जानेवारीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. परिणामी, देशातील दरही काहीसे खाली आले आहेत. यंदा पेट्रोलच्या किमतीत सुमारे 3.50 पैसे, तर डिझेलच्या किमतीत 4.15 पैशांनी वाढ झाली होती.