Mon, Jan 27, 2020 13:01होमपेज › National › मेहबुबा मुफ्तींच्या भावाच्या सुरक्षा अधिकाऱ्याची हत्या

मेहबुबा मुफ्तींच्या भावाच्या सुरक्षा अधिकाऱ्याची हत्या

Published On: Jul 19 2019 3:46PM | Last Updated: Jul 19 2019 3:46PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

दक्षिण काश्‍मीरच्‍या अनंतनाग जिल्‍ह्यातील बिजबेहारा भागात आज (ता.१९) पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्‍या नेत्‍या (पीडीपी) मेहबूबा मुफ्‍ती यांचा चुलत भाऊ सज्जाद मुफ्तींच्‍या वैयक्‍तिक सुरक्षा अधिकार्‍याची (PSO)  गोळी मारुन हत्‍या करण्‍यात आली.  

मिळालेल्‍या माहितीनुसार फारूक अहमद यांना ज्‍यावेळी गोळी मारण्‍यात आली तेव्‍हा ते बाबा मोहल्ला भागातील एका मस्जिदच्‍या बाहेर उभे होते. गोळी लागल्‍यानंतर फारुक अहमद यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. डॉक्‍टरांकडून त्‍यांना मृत घोषित करण्‍यात आले. 

हल्‍लेखोरांविषयी माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर या भागात पोलिस संरक्षण वाढवण्‍यात आले आहे. तसेच अनंतनाग जिल्‍ह्यात अलर्ट जारी करण्‍यात आला आहे तसेच इंटरनेट सेवा देखील बंद करण्‍यात आली आहे. ज्‍या पीएसओला गोळी मारण्‍यात आली आहे तो सज्‍जाद मुफ्‍ती यांच्‍या घराच्‍या बाहेरील सुरक्षेचे काम पाहत होते. 

यापूर्वी देखील जम्मू-काश्मीरमधील नेत्‍यांच्‍या घरावर दहशतवाद्यांकडून निशाणा साधण्‍यात आला आहे. पीडीपी नेते, बीजेपी नेते यांच्‍यावर देखील अशाप्रकारचे हल्‍ले करण्‍यात आले आहेत. 

अमरनाथ यात्रा असल्‍याने जम्मू-काश्मीरमधील सुरेक्षत वाढ करण्‍यात आली आहे. तसेच भारतीय लष्‍कर प्रमुख बिपिन रावत देखील आज जम्मू-काश्मीरच्‍या दौर्‍यावर आहेत.