Sat, May 25, 2019 10:32होमपेज › National › निवडणुकीनंतर पंतप्रधान ठरवू : अखिलेश यादव

निवडणुकीनंतर पंतप्रधान ठरवू : अखिलेश यादव

Published On: Jun 14 2018 1:46AM | Last Updated: Jun 14 2018 12:45AMलखनौ : वृत्तसंस्था

देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपाविरोधात लढा देण्यास सज्ज आहेत. त्यामुळे पहिल्यांदा एकत्र येऊन निवडणूक लढणे, हा आमचा उद्देश आहे. पंतप्रधान कोण, हे निवडणुकीनंतर निश्‍चित केले जाईल, असे मत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्‍त केले आहे.

ते म्हणाले, देशात भाजप लोकशाही मार्गाने कारभार करू शकत नाही, असे विरोधी पक्षांचे ठाम मत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून आघाडीचा विचार व्यक्‍त केला जात आहे. येत्या काळात यावर निर्णय होईल. सर्व प्रादेशिक पक्षांचे यासाठी सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. निवडणुकीत कोणाला पंतप्रधानपदाचा दावेदार केले जाईल, या प्रश्‍नावर ते म्हणाले, सध्या आम्ही सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र करून भक्‍कम आघाडी तयार करणार आहोत. प्रत्येक राज्यात असणार्‍या प्रादेशिक पक्षांची ताकद वेगळी आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेणे योग्य ठरेल.