Thu, Sep 19, 2019 03:27होमपेज › National › 'एनडीए'च्या डिनर पार्टीत सत्ता स्थापनेसाठी खलबते; पीएम मोदींचा केला गौरव

'एनडीए'च्या डिनर पार्टीत सत्ता स्थापनेसाठी खलबते; पीएम मोदींचा केला गौरव

Published On: May 21 2019 9:52PM | Last Updated: May 21 2019 9:52PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. एकीकडे विरोधकांची चिंता वाढली असतानाच दुसरीकडे भाजपने सत्ता स्थापनेसाठी खलबते सुरू केली आहेत. 

निकालापूर्वी आता विरोधकांबराबेरच भाजपकडून आगामी रणनिती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज, 'एनडीए'तील मित्रपक्षांसाठी डिनर पार्टी ठेवली आहे. त्यासाठी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल, प्रकाश सिंग बादल दाखल झाले. यावेळी 'एनडीए'तील मित्रपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौरव केला.

एनडीएमध्ये भाजपसह शिवसेना, अण्णा द्रमुक, संयुक्त जनता दल (जेडीयू), शिरोमणी अकाली दल हे प्रमुख पक्ष आहेत.  भोजनाचे आमंत्रण हे केवळ औचित्य असले तरी या दरम्यान पुढील रणनिती ठरविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.