'चांद्रयान २' सॉफ्ट लँडिंगचा पीएम नरेंद्र मोदींकडून उल्लेख

Last Updated: Jan 20 2020 2:43PM
Responsive image
'चांद्रयान -२'च्या अपयशाचा नरेंद्र मोदींकडून उल्लेख


नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.२०)दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी मोदींनी चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या अपयशामध्येही सकारात्मकता कशी दडली आहे हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. अपयशातूनच यशाचा मार्ग गाठता येतो असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-२ चे उदाहरण देत विद्यार्थ्यांना दिला.

►विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी

मोदी म्हणाले की, चांद्रयान-२ च्यावेळी आपण सर्वजण रात्रभर जागला होता. आपल्याला असं वाटतं होतं की, आपणचं ही मोहिम पार पाडत आहात. जेव्हा ही मोहिम यशस्वी होऊ शकली नाही तेव्हा संपूर्ण देश निराश झाला होता. सर्वजण रात्री जागत होते. कधी-कधी अपयश आपल्याला असे काही करण्यास भाग पाडते. लोकांनी मला तिकडे जाऊ नका असा सल्ला दिला होता. पण जेव्हा मोहिम अयशस्वी झाल्याचे मला कळाले तेव्हा मला रहावले नाही आणि मी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी आपला कार्यक्रम बदलला. त्यानंतर मी त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले त्यानंतर संपूर्ण देशाचे वातावरण बदलून गेले.

►तंत्रज्ञानाचे भय बाळगू नका, त्याचे गुलामही बनू नका; पीएम मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

अपयशातही यशाचे शिक्षण घेता येते. प्रत्येक प्रयत्नात उत्साह निर्माण करु शकतो. कुठल्या गोष्टीत तुम्ही अपयशी ठरलात तर त्याचा अर्थ तुम्ही यशाच्या दिशेने चालला आहात असा होतो असे मोदी म्हणाले. सात सप्टेंबरला विक्रम लँडरचे चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग पाहण्यासाठी मोदी सुद्धा बंगळुरुमधील इस्रोच्या नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित होते.