Tue, Jul 07, 2020 05:35होमपेज › National › आता मोबाईल क्रमांक होणार अकरा अंकी 

आता मोबाईल क्रमांक होणार अकरा अंकी 

Last Updated: May 31 2020 1:11AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरातील मोबाईल क्रमांक आता दहाऐवजी अकरा अंकी होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (ट्राय) यासंबंधी एक प्रस्ताव समोर आणला आहे. यामुळे मोबाईल क्रमांकाची क्षमताही वाढेल, असे ‘ट्राय’ने म्हटले आह.

मोबाईल क्रमांकाची सुरुवात 9 या अंकापासून केल्यास आणि 10 ऐवजी 11 अंकी क्रमांक वापरल्यास या क्रमांकांची क्षमता 1 हजार कोटींपर्यंत वाढेल, असे ‘ट्राय’ने या प्रस्तावात म्हटले आहे. फिक्स लाईन म्हणजेच लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करताना सुरुवातीला शून्य लावण्याची शिफारसही ‘ट्राय’ने केली आहे.

सध्या लँडलाईनवरून मोबाईल कॉल करताना शून्य लावावा लागत नाही, तसेच मोबाईलवरून लँडलाईनवर कॉल करतानाही तो लावण्याची गरज नसते. इंटरनेट डोंगलसाठी जे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. ते आता 10 ऐवजी 13 अंकी करण्याची शिफारसही ‘ट्राय’ने केली आहे. ब्रॉडबँडची संख्या वाढवणे, केबल टी.व्ही. इंटरनेट कनेक्शन, पब्लिक वाय-फाय हॉटस्पॉट अशा अन्य शिफारशीही ‘ट्राय’ने मध्यंतरी केल्या.