Thu, Jan 17, 2019 08:35होमपेज › National › रमजानमध्ये दहशतवादांविरोधी कारवाई थांबवा, केंद्राची सूचना

रमजानमध्ये दहशतवादांविरोधी कारवाई थांबवा, केंद्राची सूचना

Published On: May 16 2018 4:50PM | Last Updated: May 16 2018 4:51PMश्रीनगर : पुुढारी ऑनलाईन

रमजान काळात जम्मू काश्मीरमधील दहशतवादाविरोधातील कारवाई थांबवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून सुरक्षादलांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ऑल पार्टी मिटींगमध्ये रमजान आणि अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाविरोधातील कारवाई थांबवण्याची विनंती केली होती.  

वाजपेयी सरकारप्रमाणे मोदी सरकारने देखील जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. दहशतवादी विरोधातील कारवाईमध्ये स्थानिक लोकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. रमजान आणि अमरनाथ यात्रेवेळी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने या परिसरातील कारवाई सत्राचा विचार करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.