Mon, Mar 25, 2019 21:57होमपेज › National › मोठा दिलासा, आधार लिंकची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली 

मोठा दिलासा; आधार लिंकची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली 

Published On: Mar 13 2018 5:02PM | Last Updated: Mar 13 2018 5:05PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड विविध सेवांशी लिंक करण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने अनिश्चित कालावधीसाठी वाढवून दिली आहे. केंद्र सरकारने बँक खाते, मोबाईल नंबर, पॅन कार्ड आदी गोष्टी आधारशी लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2018 दिली होती. यासंदर्भात जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत आधार लिंकची सक्ती करता येणार नसल्याचे पाच सदस्यीय खंडपीठाने म्हटले आहे. 

वाचा: लहान मुलांसाठी आले ‘बाल आधार कार्ड’; जाणून घ्या वैशिष्टे

वाचा: पॅन कार्ड-आधार लिंक: काही शंका असल्यास येथे चेक करा

सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच अन्य सेवांसाठी  आधार सक्तीचे करण्यात आले होते. या सक्ती विरोधात तसेच आधार कायद्यालाच अनेकांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या सर्व याचिकांची सुनावणी सरन्यायाधिश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यी खंडपीठा समोर सुरु आहे.  

फक्त एका गोष्टीसाठी लागणार आधार

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील सुनावणी करताना केवळ एका गोष्टीचा अपवाद केला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदाना (सबसिडी)साठीच केवळ आधारची सक्ती करता येईल. अन्य कोणत्याही गोष्टींसाठी आधारची सक्ती करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.