Thu, Sep 19, 2019 03:29होमपेज › National › अडवाणी, जोशींचे मोदींनी घेतले आशीर्वाद, उद्धव ठाकरेंची गळाभेट

अडवाणी, जोशींचे मोदींनी घेतले आशीर्वाद, उद्धव ठाकरेंची गळाभेट

Published On: May 25 2019 6:38PM | Last Updated: May 25 2019 6:38PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या बैठकीत आज नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. संसदेच्या सेंट्ल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे मोदींनी आशीर्वाद घेतले. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची गळाभेट घेतली.

दरम्यान, नरेंद्र मोदी आजच रात्री ८ वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याच समजते. सर्व अंदाज फोल ठरवून सत्तेत आलेल्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) १७ व्या लोकसभेसाठी सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी एनडीएच्या संसदीय दलाची  बैठक आज संसदेच्या सेंट्ल हॉलमध्ये झाली. यासाठी सर्व निवडून आलेले खासदार तसेच भाजपचे अध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, अकाली दलचे प्रकाश सिंह बादल, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एलजीपीचे रामविलास पासवान आदी दिग्गज नेते उपस्थित राहिले.

सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्य आणि जागांनी स्वबळावर सत्ता खेचून आणल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.२४) पक्षाचे भीष्म पितामह लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा सुद्धा उपस्थित होते.