Thu, Nov 14, 2019 07:43होमपेज › National › जगातील सर्वात लहान महिलेस योगा करताना पहिले का?(व्हिडिओ)

जगातील सर्वात लहान महिलेस योगा करताना पहिले का?(व्हिडिओ)

Published On: Jun 20 2019 2:07PM | Last Updated: Jun 20 2019 1:45PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

देशासह जगभरात २१ जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योगा दिवस मोठ्‍या उत्‍साहात साजरा केला जातो. योगाविषयी लोकांच्‍यात जागृती निर्माण करण्‍यासाठी जगभरात योगासंबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतात या खास दिवसाचे औचित्‍य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्‍ट्रीय योगा दिवसाच्‍या एक दिवस आधी जगातील सर्वात लहान महिलेने योगाभ्‍यास करत संदेश देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. 

जगातील सर्वात लहान असणारी ही महिला दुसरी तीसरी कोण नसून आपल्‍या महाराष्‍ट्रातील नागपूरची ज्‍योती आहे. ज्‍योती  ट्रेनरसोबत योगाचे प्रात्‍यक्षिक करत आहे. यावेळी तिच्‍यासोबत काही लहान मुले देखील दिसत आहेत. ज्‍योती या फोटोत विविध प्रकारच्‍या योग मुद्रा करताना दिसत आहे. 

ज्योतीच्‍या नावाची गिनीज बुकमध्‍ये नोंद

महाराष्‍ट्रातील नागपूरची रहिवासी असलेली ज्‍योती अमगे जगातील सर्वात कमी उंचीची महिला आहे. ज्‍योतीच्या नावाची दखल  गिनीज बुक ऑफ वर्ल्डने देखील घेतली आहे. ज्‍योतीचा जन्‍म १६ डिसेंबर १९९३ ला झाला आहे. ज्‍योतीने अठारव्‍या वर्षीच जगतील सर्वात लहान महिलेचा किताब नावावर केला आहे. 

यासोबतच २०१९ च्‍या लोकसभेच्‍या निवडणुकीत ज्‍योतीने मतदान केले आहे. त्‍यावेळी देखील ज्‍योतीने मतदान केल्‍याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्‍या प्रमाणात व्‍हायरल झाले होते.