Tue, Mar 26, 2019 07:41होमपेज › National › वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नागपुर!

वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नागपुर!

Published On: Dec 07 2018 4:41PM | Last Updated: Dec 07 2018 4:41PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

येत्या काळामध्ये जगातील झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये भारताचे वर्चस्व असणार आहे. ग्लोबल इकोनॉमिक रिसर्चच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. जीडीपीच्या दृष्टीने जगातील वेगाने विकसित होत असेल्या २० शहरात भारतातील १७ शहरे असणार आहेत. 

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या संशोधन संस्थेने यासंबंधीचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार भविष्यातील जीडीपी वाढीची तुलना केल्यास २०१९ ते २०३५ यादरम्यान, वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये भारतातील १७ शहरांचा समावेश असेल. यात सुरत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर आग्रा आणि बंगळुरूचा क्रमांक असणार आहे. तर बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईची कामगिरी चांगली असेल.  हैदराबाद या क्रमवारीत चौथ्या तर नागपूर पाचव्या स्थानी आहे. त्यानंतर तिरुपूर, राजकोट, तिरुचिरापल्ली, चेन्नई आणि विजयवाडा यांचा क्रमांक आहे.  

सूरत येथे हिऱ्यांवरील प्रक्रिया आणि विक्रीचे केंद्र असल्याने तसेच याठिकाणी आयटी सेक्टर विकसित झाल्याने सूरत या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तर बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरात तंत्रज्ञान केंद्र तसेच वित्तीय सेवा देणाऱ्या अनेक कंपन्याही आहेत. भारताबाहेर नोम पेन्ह हे २०१९ ते २०३५ दरम्यान जगातील सगळ्यात वेगाने विकसित होणारे शहर असेल. तर आफ्रिकेमधील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये दार अस सलाम अव्वलस्थानी असेल. लोकसंख्येच्या बाबतीत २०३५ साली मुंबई पहिल्या १० मध्ये असेल.