केरळात मुसळधार! ९ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून 'येलो अलर्ट'

Last Updated: Jun 01 2020 7:58PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केरळमध्ये मान्सूम दाखल झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी हवामान विभागाकडून करण्यात आली. दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती विभागाचे महासंचालक मृत्यूजंय मोहपात्रा यांनी दिली. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ३ ते ४ जून दरम्यान दादरा नगर हवेली, उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र, दमण-दीव येथे मुसळधार पावसाचा पुर्वानुमान हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

केरळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने  हवामान खात्याकडून राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. हवामान खात्याने केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यासाठी हा अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे केरळमधील तापमानात कमालीच घट नोंदवण्यात आली आहे. 

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरममध्ये सोमवारचे तापमान २५ अंश सेल्सियसपर्यंत पोहचले होते. केरळच्या दक्षिण किनारी भागात आणि लक्षद्वीपमध्ये गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचा अंदाज शनिवारी हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता. पंरतु, केरळ किनारपट्टीवर दक्षिण- पश्चिम मान्सून दाखल झाल्याचा दावा 'स्कायमेट' कडून करण्यात आला होता. 

सद्यपरिस्थितीत अशी घोषणा करणे अनुकूल ठरणार नसल्याचे मत व्यक्त करीत  हवामान खात्याकडून हा दावा नाकारण्यात आला होता. 

मान्सूम अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यावर नियमितपणे विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे, असे मोहपात्रा यांच्याकडून रविवारी व्यक्त करण्यात आले होते. १ जूनपर्यंत  मान्सूम केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता.

देशभरात सध्या उष्णतेची लाट सुरू असताना सर्वांना मान्सूम दाखल झाल्याची सुखद बातमी मिळाली आहे. गेले काही दिवस अंदमान समुद्रात ठेपलेल्या मॉन्सूनने आपली आगेकूच सुरू केली होती. मान्सूनने बंगालचा उपसागर, अंदमान समुद्रातील बहुतांश भाग, अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केल्याने हवामान विभाग सतर्क झाला होता. मालदीव कॉमोरिन भाग आणि लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग आणि दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मान्सूनचे अंदमानच्या समुद्रात १६ मे रोजी नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर आगमन झाले होते. १७ मे रोजी तो आणखी थोडा पुढे सरकला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे गेल्या दोन तीन दिवसांत जोरदार पुढे वाटचाल केली होती. त्यामुळे हवामान विभागाचा यावेळी अंदाज खरा ठरवत केरळमध्ये मान्सून १ जून रोजी दाखल झाला आहे 

देशातील मान्सूमची सुरुवात केरळमधून 

भारतात दक्षिण-पश्चिम मान्सून दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान ४ महिने असतो. साधारणत: तो सर्वात पहिले केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर तो देशात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतो. मागील वर्षी अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून त्याच्या निश्चित तारखेच्या दोन दिवस अगोदर १८ मे रोजी दाखल झाला होता, परंतु गती कमी झाल्यामुळे केरळमध्ये तो उशीरा पोहोचला होता, तर संपूर्ण देशात १९ जुलै रोजी पावसाळा सुरू झाला होता. विभागाच्या म्हणण्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात भारताची रुग्णसंख्या कमी


'या' बहाद्दराचे एकाच मंडपात एकाचवेळी दोघींशी लग्न पण....


सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!


राज्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा विक्रम मोडीत


सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'


मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन


कोरोना : राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल


कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला


पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!


शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू