Thu, Jan 24, 2019 07:39होमपेज › National › पाकवर माझे प्रेम : मणिशंकर अय्यर

पाकवर माझे प्रेम : मणिशंकर अय्यर

Published On: Feb 14 2018 1:59AM | Last Updated: Feb 13 2018 8:40PMनवी दिल्ली : वृत्तसंस्था

पाकिस्तान चर्चेसाठी तयार असताना भारत सरकार चर्चा का करत नाही. चर्चेसाठी पाकने दरवाजे खुले ठेवले आहेत, याचा मला अभिमान आहे. माझे जसे भारतावर प्रेम आहे, तसे पाकवरही आहे, असे खळबळजनक वक्‍तव्य काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा केले आहे. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

गुजरात निवडणुकीच्या दरम्यान अय्यर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. यामुळे काँग्रेसला अडचणीचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा अय्यर यांनी पाकिस्तानसंदर्भात वक्‍तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तानसोबत थांबलेल्या चर्चेचा विषय उपस्थित करून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.  ते म्हणाले, भारताने आपल्या शेजारील राष्ट्रासोबत चर्चा केली पाहिजे. पाकिस्तानने चर्चेसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत; पण भारत सरकार यासाठी सकारात्मक दिसून येत नाही. दोन्ही देशांतील तणाव चर्चेतून कमी व्हावा, असे माझे मत आहे.