Fri, May 29, 2020 02:25होमपेज › National › ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Published On: Sep 18 2019 8:09PM | Last Updated: Sep 18 2019 7:32PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. या भेटीचा खुलासा करताना, ही भेट अराजकीय होती, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे ममता बॅनर्जी यांनी भेट घेतल्यानंतर आपण, नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधापदाचा कारभार स्वीकारला आहे. यानंतर त्यांची प्रथमच भेट घेतल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. ही भेट अराजकीय स्वरूपाची होती. या भेटीत मोदींसोबत अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याचे तसेच प. बंगालसाठी १३,५०० कोटी रूपयांच्या निधीची मागणी केल्याचे त्या म्हणाल्या. 

त्याचप्रमाणे जगातील दुसऱ्या सर्वाधिक मोठ्या कोळसा खाणीचे उद्धाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना प. बंगालमध्ये येण्याचे निमंत्रणही यावेळी दिले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट ममता बॅनर्जी घेण्याची शक्यता आहे.